ब्राझिलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत परस्परांच्या चिंता सामाईक केल्या.
दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवित हानीबाबत दोघांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी ब्राझिलच्या जी20 अध्यक्षतेच्या यशस्वितेसाठी भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी नवी दिल्लीत जी20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीनंतर सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा आणखी जास्त विस्तार करण्याच्या उपायांवर देखील चर्चा केली.