ओमानचे राजे सुलतान हैथाम बिन तारीक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल सुलतान तारीक यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
ओमान आणि भारतात अनेक शतकं जुनी मैत्री असल्याचं सुलतान तारीक यांनी सांगितलं. भारताच्या जनतेला त्यांनी प्रगती आणि भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुलतान तारीक यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी त्यांचे आभार मानले. डिसेंबर 2023 मधे सुलतान तारीक यांनी केलेल्या भारत दौऱ्यामुळे सर्व क्षेत्रातले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाल्याचं मोदी यांनी सांगितलं.
दोन देशांच्या परस्पर हितासाठी भारत आणि ओमान यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्धार दोनही नेत्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी सुल्तान तारीक आणि ओमानच्या जनता यांना ईद अल अधा सणासाठी शुभेच्छा दिल्या.