थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश करणारा 21 कलमी कृती आराखडा प्रस्तावित केला. बिमस्टेक राष्ट्रांमध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या समृद्ध क्षमतेचा वापर करण्यासाठी त्यांनी यावेळी भाष्य केले. म्यानमार आणि थायलंडला झालेल्या अलिकडच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यावर आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर मोदींनी भर दिला आहे. नेतृत्व करणाऱ्या तरुणांची भूमिका अधोरेखित करत बिमस्टेकला एकत्रितपणे ऊर्जा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सांस्कृतिक संबंध बिमस्टेक राष्ट्रांना आणखी जवळ आणतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

एक्स वरील एका संदेशामध्ये मध त्यांनी लिहिले,

“बिमस्टेक हे जागतिक कल्याणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ते बळकट करणे आणि आपले संबंध अधिक दृढ करणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात, मी आपल्या सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश करणारा 21 कलमी कृती आराखडा प्रस्तावित केला आहे.”

“बिमस्टेक राष्ट्रांमध्ये व्यवसाय वाढवण्याची वेळ आली आहे!”

“चला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या समृद्ध क्षमतेचा वापर करूया आणि बिमस्टेकला तांत्रिकदृष्ट्या अधिक बळकट बनवूया.”

“म्यानमार आणि थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित होते.”

“चला, आपण आपले सहकार्य अवकाशाच्या जगात घेऊन जाऊया. आपली सुरक्षा यंत्रणा देखील अधिक बळकट करूया.”

“बिमस्टेकमध्ये क्षमता निर्माण चौकटींचे एक तेजस्वी उदाहरण बनण्याची क्षमता आहे. आपण सर्वजण एकमेकांकडून शिकू आणि वाढू!”

“आपण एकत्रितपणे बिमस्टेकला ऊर्जा देऊ, ज्याने आपले तरुण पुढे याचे नेतृत्व करतील.”

“संस्कृतीसारख्या फार कमी गोष्टी जोडल्या जातात! सांस्कृतिक संबंध बिमस्टेकला आणखी जवळ आणू शकतील.”

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Oman, India’s Gulf 'n' West Asia Gateway

Media Coverage

Oman, India’s Gulf 'n' West Asia Gateway
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister extends compliments for highlighting India’s cultural and linguistic diversity on the floor of the Parliament
December 23, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended compliments to Speaker Om Birla Ji and MPs across Party lines for highlighting India’s cultural and linguistic diversity on the floor of the Parliament as regional-languages take precedence in Lok-Sabha addresses.

The Prime Minister posted on X:

"This is gladdening to see.

India’s cultural and linguistic diversity is our pride. Compliments to Speaker Om Birla Ji and MPs across Party lines for highlighting this vibrancy on the floor of the Parliament."

https://www.hindustantimes.com/india-news/regional-languages-take-precedence-in-lok-sabha-addresses-101766430177424.html

@ombirlakota