वाया गेलेले प्लॅस्टिक आणि फ्लाय ऍश यांसारख्या शाश्वत साहित्याच्या वापराला प्राधान्य देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 334बी च्या 40.2 किमी पट्टयाचा किफायतशीरपणा आणि पर्यावरण पूरकता वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यूपी-हरयाणा सीमेजवळ बाघपतपासून हा पट्टा सुरू होतो आणि हरयाणामध्ये रोहना येथे समाप्त होतो.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलेः
"शाश्वत विकास आणि वाढीव कनेक्टिव्हिटी यांची अतिशय सुयोग्य सांगड.यामुळे आर्थिक वृद्धीला देखील चालना मिळेल."
A perfect blend of sustainable development and enhanced connectivity. It will also boost economic growth. https://t.co/1YWvD84mWY
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2023