भुवनेश्वरच्या कलिंगा समाज विज्ञान संस्थेमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या आदिवासी क्रीडा महोत्सवाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या क्रीडा महोत्सवाचे आयोजन म्हणजे एक.मोठी सुरुवात असून देशाला नावलौकीक मिळवून देण्यामध्ये आदिवासी खेळाडूंची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अमृत महोत्सवाच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी व्टिट केले आहे :-
‘’आमच्या क्रीडा जगतामध्ये एक मोठा प्रारंभ! जागतिक स्पर्धेमध्ये भारताची ओळख निर्माण करण्यामध्ये आदिवासी खेळाडूंची महत्वपूर्ण भूमिका आहे. अशा प्रयत्नांमुळे देशाला या समुदायातून नवनवीन प्रतिभावंत खेळाडू मिळतील.‘’
हमारे खेल जगत में एक बड़ी शुरुआत! वैश्विक स्पर्धाओं में भारत को पहचान दिलाने में जनजातीय खिलाड़ियों की बड़ी भूमिका रही है। ऐसे प्रयासों से देश को इस समुदाय से नए-नए टैलेंट मिलेंगे। https://t.co/NTQkwEFAMn
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2023