पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे झालेल्या जी 20 संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीतील प्रतिनिधींच्या सन्मानार्थ सादर केलेल्या ‘सूर वसुधा’ या नादमधुर सुरावटीचे कौतुक केले आहे.
वाद्यवृंदामध्ये 29 जी 20 सदस्य आणि आमंत्रित देशांतील संगीतकारांचा समावेश होता. वाद्यांची वैविध्यता आणि मातृभाषेतून गाणारे गायक याद्वारे संगीत परंपरा साजरी झाली. वाद्यवृंदाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरावटीतून "वसुधैव कुटुंबकम" अर्थात जग हे एक कुटुंब आहे ही भावना प्रतीत झाली.
केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या X वरच्या पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधानांनी म्हटले;
“वसुधैव कुटुंबकमचा संदेश बिंबवण्याचा एक उत्तम मार्ग आणि तोही काशी शहरातून!”
A great way to highlight the message of Vasudhaiva Kutumbakam and that too from the eternal city of Kashi! https://t.co/DpeyEKefnO
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2023