पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी जवळच्या लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन आणि पूजा केली. मोदी यांनी तेलगू भाषेतील, रंगनाथ रामायणातील कवने ऐकली आणि आंध्र प्रदेशातील थोलू बोम्मालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक छाया कठपुतळी कला प्रकाराअंतर्गत, सादर केलेली जटायूची कथाही पाहिली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“प्रभू श्रीरामाचे भक्त असलेल्या सर्वांसाठी लेपाक्षीचे मंदिर अत्यंत महत्वाचे ठरते. आज मला वीरभद्र मंदिरात प्रार्थना करण्याचा सन्मान मिळाला. भारतातील सर्व लोक आनंदी, निरोगी आणि समृद्धीची नवीन उंची गाठतील,अशी प्रार्थना केली.”
“लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात, रंगनाथ रामायणातील कवने श्रवण केली आणि रामायणावर आधारित, कठपुतळी कार्यक्रमाचाही आनंद घेतला.”
For all those who are devotees of Prabhu Shri Ram, Lepakshi holds great significance. Today, I had the honour of praying at the Veerbhadra Temple. I prayed that the people of India be happy, healthy and scale new heights of prosperity. pic.twitter.com/VDTSdrMpCS
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2024