पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील मोढेरा येथील मोढेश्वरी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. पंतप्रधानांचे आगमन होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. मोदींनी गर्भगृहात असलेल्या मोढेश्वरी मातेसमोर माथा टेकवला आणि हात जोडून देवीचे आशीर्वाद घेतले.
पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि खासदार सी. आर. पाटील हे होते.
तत्पूर्वी, आज पंतप्रधानांनी गुजरातमधील मेहसाणा येथील मोढेरा येथे 3900 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांनी मोढेरा हे भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले.