पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं की,
संत रविदास यांच्या जयंती निमित्त त्यांना वंदन करुन त्यांनी दिलेल्या महान संदेशांचं स्मरण करुया, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांना आपल्या ट्वीरच्या माध्यमातुन आदरांजली वाहिली आहे. संत रविदास यांच्या न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण आणि समृद्ध समाजासाठी केलेल्या संकल्पनांसाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत गरिबांसाठी आम्ही राबवत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून गरिबांचं सशक्तिकरण करत आहोत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
संत रविदास जी की जयंती पर उन्हें नमन करते हुए हम उनके महान संदेशों का स्मरण करते हैं। इस अवसर पर उनके विचारों के अनुरूप न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण और समृद्ध समाज के अपने संकल्प को दोहराते हैं। उनके मार्ग पर चलकर ही हम कई पहलों के जरिए गरीबों की सेवा और उनका सशक्तिकरण कर रहे हैं। pic.twitter.com/kKuhw7cB8H
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2023