संत गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी संत गुरु रविदास यांच्या विचारांविषयीची चित्रफीतही सामायिक केली आहे.
एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“पूज्य संत गुरु रविदासजींना त्यांच्या जयंती दिनाच्या दिवशी सादर नमन आणि वंदन. समाजातील भेदभावांच्या निर्मूलनासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. सेवा, संवाद आणि बंधुभावाच्या भावनांनी परिपूर्ण असे त्यांचे संदेश समाजातल्या दुर्बल आणि वंचित वर्गाच्या कल्याणासाठी सदैव मार्गदर्शक आहेत.”
पूज्य संत गुरु रविदास जी को उनकी जन्म-जयंती पर सादर नमन और वंदन। समाज से भेदभाव के उन्मूलन के लिए उन्होंने अपना जीवन समर्पित कर दिया। सेवा, सौहार्द और भाईचारे की भावना से भरे उनके संदेश समाज के कमजोर और वंचित वर्गों के कल्याण के लिए सदैव पथ-प्रदर्शक बने रहेंगे। pic.twitter.com/iP1nGEb2oo
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2025