पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त, देशाला तिरंगी ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंगली वेंकय्या यांना आदरांजली अर्पण केली. हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगी झेंडा फडकावून आपापले सेल्फी काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे.
आपल्या X वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करतो. आपल्याला तिरंगा ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत. हर घर तिरंगा चळवळीला पाठींबा द्या, 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवा आणि त्यासोबत काढलेला सेल्फी harghartiranga.com मार्फत सगळ्यांना पाठवण्यास विसरू नका!”
Remembering Pingali Venkayya Ji on his birth anniversary. His effort in giving us the Tricolour will always be remembered.
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2024
Do support the #HarGharTiranga movement and unfurl the Tricolour between 9th and 15th August! Don’t forget to share your selfie on https://t.co/84MOUwgRyA