पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूरमधील धानक्या येथील दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय स्मारकात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले, "आमचे सरकार अंत्योदय सिध्दांतांचे पालन करून देशातील सर्वात गरीब लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी वचनबद्ध आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर वर पोस्ट केले:
"जयपूरमधील धानक्या येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय स्मारकात त्यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या जीवनाशी निगडित विविध पैलू पाहून एका नव्या उर्जेची अनुभुती मिळाली. आमचे सरकार अंत्योदय सिंद्धांताचा मार्ग अनुसरून देशातील सर्वात गरीबाचे जीवन सुखकर बनवण्यासाठी वचनबद्ध आहे."
जयपुर के धानक्या में आज पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय स्मारक जाकर उन्हें पुष्पांजलि अर्पित की। उनकी जन्म-जयंती पर यहां उनके जीवन से जुड़े अलग-अलग पहलुओं को देखकर एक नई ऊर्जा का अनुभव हुआ। हमारी सरकार उनके अंत्योदय के सिद्धांत पर चलकर देश के गरीब से गरीब का जीवन आसान बनाने के… pic.twitter.com/Bu5NdIJnGJ
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2023