Quoteराज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पुढील अनेक पिढ्या त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे : 

"आज आपण महान चित्रकर्मी, दूरदर्शी चित्रपटनिर्माते, अभिनेते आणि दिग्गज शोमॅन राज कपूर यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत! त्यांची प्रतिभा भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडत अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचली आहे."

"राज कपूर यांची चित्रपटसृष्टीबद्दलची तळमळ त्यांच्या लहान वयातच वाढीला लागली आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ते अग्रणी कथाकार म्हणून उदयास आले. त्यांच्या चित्रपटांमध्ये कलात्मकता,, भावभावना आणि सामाजिक भाष्य यांची उत्कृष्ट सांगड घातलेली असे. त्यात सामान्य माणसांच्या आशा-आकांक्षा आणि संघर्षाचे प्रतिबिंब दिसत असे."

"त्यांच्या चित्रपटातील सशक्त पात्र आणि अविस्मरणीय सुमधुर गाणी आजही जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत.  त्यांच्या चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण संकल्पनांच्या सहजसोप्या आणि उत्कृष्टरीत्या केलेली मांडणीचे प्रेक्षकांना कौतुक वाटत असे.  त्यांच्या चित्रपटांमधील संगीतही प्रचंड लोकप्रिय आहे.” 

“राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते. चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पुढील अनेक पिढ्या त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतात. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्जनशील जगाला त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतो.”

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption

Media Coverage

In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 फेब्रुवारी 2025
February 24, 2025

6 Years of PM Kisan Empowering Annadatas for Success

Citizens Appreciate PM Modi’s Effort to Ensure Viksit Bharat Driven by Technology, Innovation and Research