पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी नेता श्री कार्तिक उराव यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.”श्री कार्तिक उराव हे एक महान नेते आहेत ज्यांनी आदिवासी समाजाचे हक्क आणि स्वाभिमानासाठी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले; तसेच आदिवासी संस्कृती आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाचे मुखपत्र म्हणून भूमिका बजावली,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले आहे
आपल्या X पोस्टवर श्री मोदी यांनी लिहिले आहे:
"आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे देशाचे महान नेते कार्तिक उराव जी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन. आदिवासी समाजाचे ते एक प्रमुख प्रवक्ते होते, ज्यांनी आदिवासी संस्कृती वंचितांच्या कल्याणासाठी आणि अस्मिता जपण्यासाठी सतत संघर्ष केला.
आदिवासी समुदाय के अधिकार और आत्मसम्मान के लिए जीवनपर्यंत समर्पित रहे देश के महान नेता कार्तिक उरांव जी को उनकी जन्म-शताब्दी पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। वे जनजातीय समाज के एक मुखर प्रवक्ता थे, जो आदिवासी संस्कृति और अस्मिता की रक्षा के लिए निरंतर संघर्षरत रहे। वंचितों के कल्याण के…
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2024