पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान तत्त्वज्ञ, विचारवंत आणि आध्यात्मिक नेते श्री अरविंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त समाजमाध्यम एक्स वर एका पोस्टद्वारे आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये श्री अरविंद यांच्या शाश्वत वारशाचा आणि भारताच्या राष्ट्रीय जागृतीवर त्यांंच्या सखोल प्रभावाचा उल्लेख केला.
आदरांजलीच्या संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले, "श्री अरविंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. एक महान तत्त्वज्ञ, विचारवंत आणि अध्यात्मिक नेते म्हणून आजही त्यांचे स्मरण केले जाते. राष्ट्रीय प्रबोधनावरील त्यांचा प्रभाव अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांनी कल्पना केलेल्या भारताच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत"
Tributes to Sri Aurobindo on his birth anniversary. He is remembered as a remarkable philosopher, thinker and spiritual leader. His emphasis on national awakening keeps inspiring generations. We remain committed to fulfilling the India he envisioned.
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2024