संत कबीरदासजी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, संत कबीरदासजी यांनी फक्त समाजातील दुष्ट शक्तींविरुद्धच लढा दिला नाही तर त्यांनी संपूर्ण जगाला मानवतेची आणि प्रेमाची शिकवण दिली. त्यांनी दाखविलेला मार्ग येणाऱ्या अनेक पिढ्यांना बंधुभावाच्या आणि सद्भावनेच्या पथावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहील.
संत कबीर दास यांचे निर्वाण स्थळ असलेल्या मघर या ठिकाणाला काही वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीच्या वेळची छायाचित्रे देखील पंतप्रधानांनी सगळ्यांसाठी प्रदर्शित केली.
संत कबीर दास जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। उन्होंने न केवल सामाजिक कुरीतियों पर प्रहार किया, बल्कि दुनिया को मानवता और प्रेम का संदेश दिया। उनका दिखाया मार्ग हर पीढ़ी को भाईचारा और सद्भावना के साथ आगे बढ़ने के लिए प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2021
कुछ वर्ष पूर्व मुझे मगहर में संत कबीर दास की निर्वाण स्थली जाने का सौभाग्य प्राप्त हुआ था। उस समय की कुछ तस्वीरें साझा कर रहा हूं। pic.twitter.com/pgUfwWHpR3
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2021