पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मुखर्जी यांची मातृभूमीवरील श्रद्धा आणि त्याग देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांनी भारतमातेला गौरवान्वित करणाऱ्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. मातृभूमीसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील."
अपने प्रखर राष्ट्रवादी विचारों से मां भारती को गौरवान्वित करने वाले डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। मातृभूमि के लिए उनका समर्पण और त्याग देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा। pic.twitter.com/QYELTn45fb
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2024