पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वॉर्सा येथील डोब्री महाराजा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
वॉर्सा येथील गुड महाराजा स्क्वेअर येथे असलेले हे स्मारक म्हणजे नवानगरचे [आधुनिक काळातील गुजरातमधील जामनगरचे] जामसाहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांच्यावषयी पोलंडचे नागरिक आणि सरकार यांच्या मनातील आदर आणि कृतज्ञतेचे स्मरण आहे. दुसऱ्या महायुद्धात जामसाहेबांनी एक हजाराहून अधिक पोलिश मुलांना आश्रय दिला आणि आज पोलंडमध्ये डोब्री (चांगला) महाराजा म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या उदारतेचा गाढा प्रभाव पोलिश लोकांवर सदैव आहे. या स्मारकस्थळी जामसाहेबांनी आश्रय दिलेल्या पोलिश नागरिकांच्या वंशजांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी स्मारकस्थळी भेट दिल्याने भारत आणि पोलंड देशातील जनतेने जपलेला एक विशेष ऐतिहासिक संबंध अधोरेखित झाला आहे.