पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
"मी पंडित भीमसेन जोशी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो. संस्कृती आणि संगीताच्या जगात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आपल्या स्मरणात आहे. त्यांच्या गायनाला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळाली आहे. हे वर्ष विशेष आहे कारण आपण त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात करत आहोत.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
I pay homage to Pandit Bhimsen Joshi Ji on his birth anniversary. We recall his monumental contribution to the world of culture and music. His renditions have attained global popularity. This year is special because we begin his birth centenary celebrations.
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2021