पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानामध्ये जॉर्ज टाऊन इथल्या ऐतिहासिक प्रोमनेड गार्डनला भेट दिली आणि तिथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. बापूंचे शांतता व अहिंसा याबाबतचे विचार मानवतेला नेहमीच मार्गदर्शन करतील असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1969 मध्ये गांधीजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभारण्यात आला.
तिथून जवळच असलेल्या आर्य समाज स्मारकालाही पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली. गयानामधील आर्य समाज चळवळीच्या शताब्दी वर्षानिमित्त 2011 मध्ये या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते.
Paid homage to Mahatma Gandhi at his statue in Georgetown, Guyana. His timeless values give strength and hope to the entire humankind. His thoughts provide many solutions towards making our planet better and more sustainable. pic.twitter.com/xA0NqiLpGq
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024