पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधान आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विविध प्रमुख विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत.
"मी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहतो. आज मी पुण्यात असून, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार आहे. आपल्या इतिहासातील एका महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याशी निगडित हा पुरस्कार मला प्रदान करण्यात येत आहे याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे"
"मी महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहे."
असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
I pay homage to Lokmanya Tilak on his Punya Tithi. I will be in Pune today, where I will accept the Lokmanya Tilak National Award. I am indeed humbled that I have been conferred this award which is closely associated with the work of such a great personality of our history.
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023