‘डॉ.हरेकृष्ण महताबजी हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे तसेच समानतेचे जीवन जगता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महताबजी यांचा गौरव केला आहे. डॉ.हरेकृष्ण महताब यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी डॉ. महताब यांच्या आदर्शांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्धता व्यक्त केली.
राष्ट्रपतींनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधान लिहितात:
“डॉ.हरेकृष्ण महताबजी हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे तसेच समानतेचे जीवन जगता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले. ओदिशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय आहे. ते प्रगल्भ विचारवंत तसेच बुद्धिवंत देखील होते. त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो तसेच त्यांच्या आदर्शांची पूर्तता करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतो.”
Dr. Harekrushna Mahatab Ji was a towering personality who devoted his life to making India free and ensuring a life of dignity and equality for every Indian. His contribution towards Odisha's development is particularly noteworthy. He was also a prolific thinker and intellectual.… https://t.co/vNg3iL8ap6
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024