पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुंगीपाडा येथे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही राष्ट्रप्रमुखांनी किंवा राज्यप्रमुखांनी किंवा शासनप्रमुखांनी बंगबंधूंच्या या समाधीस्थळाच्या वास्तूला भेट देणे हे प्रथमच घडले आहे, ही अशी पहिलीची भेट नोंदविली गेली आहे. ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बकुळीच्या झाडाचे रोपे याठिकाणी लावले. यावेळी त्यांच्याबरोबर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या भगिनी शेख रेहाना यांच्यासह उपस्थित होत्या.
समाधीस्थळाच्या वास्तूमधील अभ्यागतांच्या पुस्तिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, "बंगबंधूंचे जीवन हे बांग्लादेशातील लोकांच्या हक्कांसाठी, त्यांची सर्वसमावेशक संस्कृती आणि त्यांची ओळख टिकवून ठेवण्यासाठीच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे."