पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री भारतीय जनौषधि परियोजनेच्या लाभार्थ्यांशी आणि जन औषधी केंद्रांच्या दुकान मालकांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले की कोरोना विषाणूच्या धोक्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. भारताकडेही अत्यंत कुशल डॉक्टर,  उत्तम वैद्यकीय संसाधने तसेच नागरिकांमध्ये संपूर्ण जागरूकता आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात जागरूक नागरिकांची खूप महत्वाची भूमिका असते, असे ते म्हणाले.

|

पंतप्रधान म्हणाले की वारंवार हात धुण्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे नाही. शिंकताना आणि खोकताना आपले तोंड आणि नाक झाकून घ्या जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही अशी सूचना त्यांनी केली.

“कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झाल्याची खात्री पटलेल्या सर्व रुग्णांना आवश्यक देखरेखीखाली ठेवले जात आहेत. मात्र एखाद्या व्यक्तीला संशय आला असेल की तो संक्रमित जोडीदाराच्या संपर्कात आला होता, तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी जावे. कुटुंबातील अन्य लोकांनाही संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांनी देखील आवश्यक त्या चाचण्या केल्या पाहिजेत”, असे पंतप्रधान म्हणाले.

|

कोरोना या साथीच्या रोगाबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

“आणि हो, संपूर्ण जग नमस्तेची सवय लावून घेत आहेत. काही कारणास्तव जर आपण ही सवय सोडून दिली असेल तर हात जोडून नमस्ते करण्याची सवय पुन्हा नव्याने लावून घेण्याची ही योग्य वेळ आहे’, असेही ते पुढे म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read PM's speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Govt: 68 lakh cancer cases treated under PMJAY, 76% of them in rural areas

Media Coverage

Govt: 68 lakh cancer cases treated under PMJAY, 76% of them in rural areas
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 मार्च 2025
March 19, 2025

Appreciation for India’s Global Footprint Growing Stronger under PM Modi