पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ओडिशा येथे आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून करण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की, हे केवळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाही, तर भारतातील आगामी क्रीडा चळवळीची सुरूवात आहे. इथे तुम्ही केवळ एकमेकांचे स्पर्धक नाही तर ही स्पर्धा तुमच्या स्वतःशी सुद्धा आहे.
मी तुमच्याशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडलो गेलो आहे. परंतु, मी स्पर्धेच्या ठिकाणचा उत्साह, तेथील वातावरण, तुमच्यातील उत्सुकता, आवड या सगळ्यांना अनुभवतो आहे. भारताच्या इतिहासातील पहिली खेलो इंडिया विद्यापिठीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आजपासून ओडिशा इथे सुरू होत आहे. भारताच्या क्रीडा जगताच्या इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण आहे. भारताच्या क्रीडा विश्वासाठी देखील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या कानाकोपऱ्यातल्या युवकांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण करण्यामध्ये आणि युवकांमधील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभा शोधण्यासाठी खेलो इंडिया मोहिमेने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१८ मध्ये जेव्हा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला, तेव्हा ३५०० खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला होता. मात्र, केवळ तीन वर्षात हा खेळाडूंचा आकडा आता दुपटीने वाढून सहा हजारांपेक्षा अधिक झाला आहे.
“चालू वर्षात खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांनी ८० विक्रम मोडले आहेत. त्यापैकी ५६ विक्रम आपल्या मुलींच्या नावावर आहेत. आपल्या मुली विजयी झाल्या आहेत. आपल्या मुलींनी कमाल केली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की या मोहिमांमधून पुढे आलेली ही प्रतिभा कोणा मोठ्या शहरांमधील नाही तर लहानशा शहरांमधून आली आहे,“ पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, भारतात गेल्या पाच ते सहा वर्षांत क्रीडा क्षेत्रातील सहभाग आणि प्रसारासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. खेळाडूंमधील प्रतिभा शोधण्याची प्रक्रिया, प्रशिक्षण, तसेच निवड प्रकिया यातही पारदर्शकतेला महत्त्व दिले जात आहे.
“यातीलच काही खेळा़डू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोहिमेतील खेळाडूंनी देशाला विविध क्रीडा स्पर्धांमधून जसे की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई स्पर्धा, एशियन पॅरा गेम्स, यूथ ऑलिम्पिक्स यामधून २०० हून अधिक पदके मिळवून दिली आहेत. २०० पेक्षा अधिक सुवर्ण पदके मिळविण्याचे ध्येय आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या स्वतःच्या सादरीकरणात सुधारणा करा आणि तुमच्या आकांक्षांना नवी उंची द्या,“ असे पंतप्रधान म्हणाले.
मैं आपके साथ टेक्नॉलॉजी के माध्यम से जुड़ रहा हूं, लेकिन वहां जो माहौल है, जो उत्साह है, जो जुनून है, जो ऊर्जा है, उसको मैं अनुभव कर सकता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
आज ओडिशा में नया इतिहास बना है। भारत के इतिहास में पहले खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स की शुरुआत आज से हो रही है।
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
ये भारत के खेल इतिहास में ऐतिहासिक पड़ाव तो है ही, भारत के खेलों के भविष्य के लिए भी एक बड़ा कदम है: PM @narendramodi
आने वाले दिनों में आपके सामने लक्ष्य 200 से ज्यादा गोल्ड मेडल जीतने का तो है ही, उससे भी अहम आपके अपने प्रदर्शन में सुधार, आपके खुद के सामर्थ्य को नई ऊंचाई देना है।
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
भुवनेश्वर में आप एक दूसरे से तो कंपीट कर ही रहे हैं, खुद से भी कंपीट कर रहे हैं: PM @narendramodi
आज का ये दिन सिर्फ एक टूर्नामेंट का आरंभ मात्र नहीं है, बल्कि भारत में खेल आंदोलन के अगले चरण की शुरुआत है।
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
खेलो इंडिया अभियान ने देश के कोने-कोने में खेलों के प्रति आकर्षण और युवा टैलेंट की पहचान में अहम भूमिका निभाई है: PM @narendramodi
साल 2018 में जब खेलो इंडिया गेम्स की शुरुआत हुई थी, तब इसमें 3500 खिलाड़ियों ने हिस्सा लिया था। लेकिन महज तीन वर्षों में खिलाड़ियों की संख्या 6 हजार से अधिक हो गई है, यानि लगभग दोगुनी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
बीत 5-6 वर्षों से भारत में Sports के Promotion और Participation के लिए ईमानदार प्रयास किए जा रहे हैं। टैलेंट की पहचान हो, ट्रेनिंग हो, या फिर चयन प्रक्रिया हो, हर तरफ ट्रांसपेरेंसी को प्रमोट किया जा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
ये वो खिलाड़ी हैं जो टोक्यो ओलंपिक्स में हिस्सा लेने के लिए संभावित हैं। इस योजना का लाभ पाने वाले खिलाड़ियों ने कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, एशियन पैरा गेम्स, यूथ ओलंपिक्स जैसे मुकाबलों में 200 से अधिक पदक देश को दिलाए हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020
खिलाड़ी अपना ध्यान सिर्फ अपने श्रेष्ठ प्रदर्शन पर लगाए, बाकी की चिंता देश कर रहा है। प्रयास ये है कि पढ़ाई के साथ-साथ खेल भी बढ़े और फिटनेस का लेवल भी ऊंचा हो: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2020