पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेनेडाचे पंतप्रधान डिकॉन मिशेल,यांची 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली.
कॅरीकाॅमचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल आणि दुसऱ्या भारत-कॅरीकाॅम शिखर परिषदेतील चर्चेचे प्रभावीपणे संचालन केल्याबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान मिशेल यांचे अभिनंदन केले.
बैठकीदरम्यान, आयसीटी, आरोग्यसेवा, क्षमता विकास आणि हवामान बदलावर कार्यवाही या क्षेत्रातील विकास सहकार्यावर यावेळी चर्चा झाली.पंतप्रधान मिशेल यांनी कोविड महामारीच्या दरम्यान भारताने दिलेल्या लस पुरवठ्याच्या समर्थनासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ग्लोबल साउथ देशांचे भारत करत असलेल्या नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली.
The Prime Minister of Grenada, Mr. Dickon Mitchell and I had a fruitful meeting. We agreed to strengthen bilateral cooperation in IT, healthcare, education and agriculture. Also appreciated his efforts in hosting the 2nd India-CARICOM Summit. pic.twitter.com/fQHCLhxg72
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024