अमेरिकेत सुरु असलेल्या क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची भेट घेतली. या भेटीला खास स्वरुप देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी विलमिंग्टन इथल्या आपल्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन केले होते.
भारत आणि अमेरिकेतील भागीदारीला चालना देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. यावेळी पंतप्रधानांनी जून 2023 मध्ये केलेला अमेरिकेचा दौरा आणि सप्टेंबर 2023 मध्ये जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेनिमीत्त राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या भारत भेटीचे स्मरण बायडेन यांना करून दिले. या भेटींनी भारत आणि अमेरिकेमधील भागीदारीला अधिक गतिमानता आणि गहन अर्थ प्राप्त करून दिला असल्याची बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
सद्यस्थितीत भारत आणि अमेरिकेत एक सुदृढ व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित झाली आहे. आणि या भागिदारीने परस्पर सामायिक लोकशाही मुल्ये, परस्पर हित संबंधांचे अभिसरण आणि परस्परांच्या नागरिकांमधली जीवंतपणाची अनुभुती देणारे संबंध अशा मानवी जीवनाशी संबंधित व्यापक पैलूंना स्पर्ष केला असल्याची बाबही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केली.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पुढे जात दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवरही चर्चा झाली, तसेच भारत - प्रशांत क्षेत्र आणि त्याशिवायच्या जागतिक तसेच प्रादेशिक मुद्द्यांबद्दलच्या परस्परांच्या मतांचीही दोन्ही नेत्यांनी देवाणघेवाण केली. दोन्ही देशांमधली मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रासाठी, परस्परांधल्या संबंधांची क्षमता आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गुणवैशिष्ट्यावरही दोन्ही नेत्यांनी विश्वास व्यक्त केला.
I thank President Biden for hosting me at his residence in Greenville, Delaware. Our talks were extremely fruitful. We had the opportunity to discuss regional and global issues during the meeting. @JoeBiden pic.twitter.com/WzWW3fudTn
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2024