वैविध्यपूर्ण स्वच्छता उत्पादनांची निर्मिती करणारी प्रमुख पोलिश उत्पादक कंपनी ‘टीझेडएमओ’इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका ॲलिना पोसलुसझनी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी 'मेक इन इंडिया' मोहीम आणि भारताच्या थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणांविषयी अलिकडच्या उदारीकरणासारख्या विविध धोरणांची आणि उपक्रमांची माहिती दिली. भारतामध्ये भरभराट होत असलेली बाजारपेठ आणि गुंतवणुकीच्या संधी लक्षात घेऊन त्यांनी ‘टीझेडएमओ’च्या विस्तार योजनांबाबतही जाणून घेतले.
यावेळी ॲलिना पोसलुसझनी यांनी भारताकडून मिळत असलेले समर्थन आणि संधींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.