गुजरातमधील गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांची भेट झाली. त्यांनी भारतात सेमीकंडक्टर निर्मिती परिसंस्थेला चालना देण्याबाबत मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या योजनांवर चर्चा केली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"@MicronTech चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांनी गांधीनगरमध्ये पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. त्यांनी भारतात सेमीकंडक्टर निर्मिती परिसंस्थेला चालना देण्याबाबत मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या योजनांवर चर्चा केली.”
Mr. Sanjay Mehrotra, President and CEO of @MicronTech, met PM @narendramodi in Gandhinagar. They discussed Micron Technology's plans to bolster the semiconductor manufacturing ecosystem within India. pic.twitter.com/JxLDsul2s0
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023