पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिलेनियम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावेल लोपिन्स्की यांची भेट घेतली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या या प्रख्यात पोलिश कंपनीचे पुणे येथे कार्यालय आहे.
या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम तसेच गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्यामुळे भारताच्या विकासगाथेला बळ मिळाल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी लोपिन्स्की यांना विस्तार योजनांविषयी विचारले. तसेच नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात भारत-पोलंड यांच्यातील व्यावसायिक सहकार्याच्या महत्त्वपूर्ण संधींचा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजक लोपिन्स्की यांना व्यवसाय सुलभता आणि गुंतवणूक -स्नेही वातावरणाप्रति भारताच्या वचनबद्धतेची ग्वाही दिली.