पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिम्पू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली.पारो ते थिंपू या संपूर्ण प्रवासात लोकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले ,भूतानच्या लोकांकडून झालेल्या या अनोख्या स्वागताबद्दल पंतप्रधानांनी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे आभार मानले
भारत-भूतान मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण आणि अनोख्या संबंधाबद्दल पंतप्रधान आणि भूतानचे राजे यांनी समाधान व्यक्त केले. उभय देशांमध्ये मैत्री आणि सहकार्याचे दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने ड्रुक ग्याल्पो पुरस्काराने दिलेल्या मार्गदर्शक दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या बैठकीमध्ये द्विपक्षीय सहकार्याचा संपूर्ण आढावा घेण्याची संधी प्राप्त झाली. भूतानसाठी भारत आणि भारतासाठी भूतान हे चिरस्थायी वास्तव असल्याचे लक्षात घेत, दोन्ही नेत्यांनी परिवर्तनात्मक सहकार्य पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली.उभय नेत्यांनी ऊर्जा, विकास सहकार्य, युवा, शिक्षण, उद्यमशीलता आणि कौशल्य विकास या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार करण्यासाठी पुढाकारांवर चर्चा केली. .उभय नेत्यांनी गेलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्पाच्या संदर्भात संपर्क सुविधा आणि गुंतवणुकीच्या प्रस्तावांमधील प्रगतीवरही चर्चा केली.
भारत आणि भूतान यांच्यात मैत्री आणि सहकार्याचे अनोखे नाते आहे, जे परस्पर विश्वास आणि मतैक्याचे वैशिष्ट्य आहे.