झेक प्रजासत्ताकचे (झेकोस्लोव्हाकिया) पंतप्रधान पेट्र फियाला, व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी 9-11 जानेवारी 2024 दरम्यान भारत भेटीसाठी आले असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी विशेषतः माहिती (ज्ञान), तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत अनेक झेक कंपन्यांनी संरक्षण, रेल्वे आणि विमान वाहतूक क्षेत्रात भारतीय उत्पादकांशी भागीदारी केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी असेही अधोरेखित केले की भारताची विकास गाथा आणि झेक प्रजासत्ताकचा मजबूत औद्योगिक पाया हे दोन जागतिक पुरवठा साखळीतील आदर्श भागीदार आहेत.
दोन्ही नेत्यांनी भारत-झेकोस्लोव्हाकिया द्विपक्षीय संबंधांमधील महत्वाचा टप्पा म्हणून, नवोन्मेषातील भारत-झेकोस्लोव्हाकिया धोरणात्मक भागीदारीच्या संयुक्त निवेदनाला दोन्ही देशांनी दिलेल्या स्वीकृतीचे स्वागत केले. स्टार्ट-अप आणि नवोन्मेष, सायबर-सुरक्षा, डिजिटल क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, आण्विक ऊर्जा आणि चक्राकार अर्थव्यवस्था, यासारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांच्या परस्पर पूरकतेचा लाभ घेणे, हे या संयुक्त निवेदनाचे उद्दिष्ट आहे.
झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान फियाला जयपूर येथे भेट देणार असून, यावेळी एनआयएमएस विद्यापीठ त्यांना मानद (Honoris Causa) डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करेल.