पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली.
भूतानचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये शपथ ग्रहण केल्यानंतर हा त्यांचा पहिलाच औपचारिक परराष्ट्र दौरा आहे.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय भागीदारी, पायाभूत सेवा सुविधांचा विकास, संपर्कयंत्रणा, ऊर्जा, जलविद्युत सहकार्य, नागरिकांचा नागरिकांशी संवाद आणि विकासात्मक सहकार्य इत्यादी विविध क्षेत्रांतील मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतान या दोन्ही देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखी मैत्री अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
भूतानच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांमध्ये भारत एक विश्वासार्ह, खात्रीशीर आणि मोलाचा भागीदार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी भारताच्या भूमिकेबद्दल मनापासून कौतुक केले.
भूतानचे महामहिम राजे यांच्या वतीने पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवड्यात भूतानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.