पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या सदस्यांनी मोदींना आमंत्रित केले.
“आपले आमंत्रण प्राप्त होऊन, मी धन्य झालो आहे. माझ्या आयुष्यातील हा एक भाग्याचा क्षण असेल, की ह्या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळेल.”
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
"जय सिया राम!
आज माझ्या मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. नुकतेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्री राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
मला खूप धन्य वाटते आहे. माझ्या आयुष्यात मी या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होईन हे माझे भाग्य आहे.”
जय सियाराम!
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023
आज का दिन बहुत भावनाओं से भरा हुआ है। अभी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के पदाधिकारी मुझसे मेरे निवास स्थान पर मिलने आए थे। उन्होंने मुझे श्रीराम मंदिर में प्राण-प्रतिष्ठा के अवसर पर अयोध्या आने के लिए निमंत्रित किया है।
मैं खुद को बहुत धन्य महसूस कर रहा… pic.twitter.com/rc801AraIn