इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन या संस्थेच्या सचिव डोरिन बागदेन मार्टिन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. पृथ्वीच्या भल्यासाठी आणि शाश्वततेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ या विषयावर दोन्ही मान्यवरांची सविस्तर चर्चा झाली.
डोरिन बागदेन मार्टिन यांच्या ट्विट संदेशाला प्रतिसाद म्हणून पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की
@ITUSecGen Doreen Bogdan-Martin यांना भेटून आनंद झाला. वसुंधरेच्या भल्यासाठी आणि शाश्वततेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ या विषयावर आमची सविस्तर चर्चा झाली.
Glad to have met @ITUSecGen Doreen Bogdan-Martin. We had extensive discussions on leveraging digital technology for a better and sustainable planet. https://t.co/3WH5tlogYw
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2023