पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये फ्रेंच अंतराळ अभियंता, पायलट, युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर आणि अभिनेता थॉमस पेस्केट यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी पेस्केट यांच्याशी भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती, विशेषत: स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि खाजगी क्षेत्राच्या अधिकाधिक सहभागाला प्रोत्साहन देणे याबद्दल चर्चा केली. तरुणांना प्रेरित करण्यासाठी तसेच अंतराळ क्षेत्रातील सहकार्याची चाचपणी करण्यासाठी पंतप्रधानांनी यावेळी पेस्केट यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले.
पेस्केट यांनी पंतप्रधानांसोबत अंतराळवीर म्हणून त्यांना आलेले अनुभव सामायिक केले आणि भविष्यातील अंतराळ कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्य स्वरूपांवर चर्चा केली.
When it comes to motivating youngsters towards science and space, Thomas Pesquet’s name figures prominently. It was a delight to meet him and exchange views on a wide range of subjects. His energy and insights are very valuable. @Thom_astro pic.twitter.com/QGgFHLcJCo
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2023