पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष गरलार्ड लारचर यांची 13 जुलै 2023 रोजी भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारीचा भक्कम पाया असलेल्या लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता या समान मूल्यांचे महत्व अधोरेखित केले.
भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षतेचे प्राधान्यक्रम, तंत्रज्ञानाचा वापर करताना लोकशाही मूल्यांचा अंगीकार आणि दोन वरिष्ठ सभागृहांमधील सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. याव्यतिरिक्त परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील विचारविनिमय झाला.
Delighted to have met Mr. @gerard_larcher, President of the @Senat. Had productive exchanges on ways to deepen India-France cooperation across diverse sectors. pic.twitter.com/KFHWZ6c1Wj
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2023
Ravi d'avoir rencontré M. @gerard_larcher, Président du @Senat. Échanges productifs sur les moyens d'approfondir la coopération entre l'Inde et la France dans divers secteurs. pic.twitter.com/Kq34zr7AJt
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2023