शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांच्या व्यापारासाठी मदत करून, त्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) सुरू करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 6,865 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली असून प्रत्येक FPOला प्रत्येकी 15 लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. FPOच्या सदस्यांना संघटनेच्या माध्यमातून अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर, सल्ला, वित्तपुरवठा, आणि बाजारपेठेविषयी माहिती घेणे यासारखी कामे एकत्रितपणे करता येणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वेगाने वाढ होऊ शकेल. चित्रकूट, उत्तरप्रदेश येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, “शेतकरी कायमच उत्पादक राहिले आहेत. मात्र FPOच्या मदतीने ते आपल्या शेतमालाचा व्यापारदेखील करू शकतील. ते पिकांची लागवड करण्याबरोबरच योग्य भाव मिळवण्यासाठी कुशल व्यापारी ही भूमिकाही निभावू शकतील. ”