पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुतीकोरीन बंदरातल्या वृक्षारोपण उपक्रमाचं कौतुक केले आहे.वर्ष 2022 मध्ये बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने तुतीकोरीन बंदरात दहा हजार रोपटी लावली होती ज्यांचे आता वृक्षात रूपांतरण झाले आहे, जे येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त सिद्ध होईल.
बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने केलेल्या ट्विटला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की,
“पर्यावरण सुरक्षिततेच्या उद्देशाने केलेल्या या प्रामाणिक आणि दूरगामी प्रयत्नांसाठी @vocpa_tuticorin यांचे खूप खूप अभिनंदन!”
पर्यावरण सुरक्षा की दिशा में इस नेक और दूरदर्शी प्रयास के लिए @vocpa_tuticorin को बहुत-बहुत बधाई। https://t.co/QLFmlfMvxV
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2023
சுற்றுச்சூழல் பாதுகாப்பை நோக்கிய உன்னதமான மற்றும் தொலைநோக்குடன் கூடிய முயற்சிக்கு @vocpa_tuticorin க்கு நல்வாழ்த்துகள். https://t.co/QLFmlfMvxV
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2023