पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या खुंटी लोकसभा मतदारसंघातील, गुमला येथे महिला विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत सुमारे 15,000 महिला सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले आहे. त्यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या ट्विट थ्रेडसना उत्तर दिले. खुंटी लोकसभा मतदारसंघांतर्गत पालकोट (गुमला) येथे महिला विकास मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत सुमारे 15,000 महिलांनी भाग घेतल्याची माहिती या ट्विटमध्ये मुंडा यांनी दिली आहे. या अधिवेशनात 944 महिला मंडळातील महिला सहभागी झाल्या होत्या.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"खूपच कौतुकास्पद प्रयत्न. महिलांची वाढती भागीदारी हे त्यांच्या सक्षमीकरणाचे आणि विकासाचे प्रतीक आहे.
बहुत प्रशंसनीय प्रयास। महिलाओं की बढ़ती भागीदारी उनके सशक्तिकरण और विकास का द्योतक है। https://t.co/BuBC5PLMO2
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2023