पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे मोदी यांनी अभिनंदन केले.
लुप्त होत चाललेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन आणि मतदारसंघातील विविध अमृत सरोवरांच्या बांधकामाबाबत झाशीच्या खासदारांच्या X थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे;
“उत्तर प्रदेशामधील झाशी येथे जल संधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून होत असलेल्या प्रयत्नांचे परिणाम अतिशय उत्साहवर्धक आणि त्याबरोबरच संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण आहेत. या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन!”
उत्तर प्रदेश के झांसी में जल संरक्षण और भूजल स्तर को बढ़ाने के लिए जनभागीदारी से हो रहे इन प्रयासों के परिणाम बेहद उत्साहवर्धक होने के साथ ही देशभर के लिए एक मिसाल हैं। इस नेक कार्य से जुड़े हर किसी को मेरी बहुत-बहुत बधाई! https://t.co/sJobCxLMda
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2023