पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्करोग बरा करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याकरिता होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
एका एक्स पोस्टमध्ये केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी ईएसआय महामंडळाच्या 191व्या बैठकीत देशभरातील 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरेपी सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले;
“ कर्करोग बरा करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीचे हे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. देशभरातील अनेक लोकांना त्याचा फायदा होईल.”
Commendable effort to strengthen the infrastructure to cure cancer. It will benefit several people across the nation. https://t.co/De7cthea9J
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2023