पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी लोकांनी केलेले श्रमदान अत्यंत कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांच्या ट्विट थ्रेडला त्यांनी उत्तर दिले आहे. सिंह यांनी लोकप्रतिनिधी, जबलपूर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह संग्राम सागर परिसराच्या सुशोभीकरणाची पाहणी करून त्याविषयी ट्विट केले होते.
त्यावर पंतप्रधानांनी ट्विट केले;
''जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी जनतेच्या श्रमदानाचा हा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे.”
जबलपुर के प्राचीन संग्राम सागर के पुनरोद्धार के लिए लोगों के श्रमदान का यह प्रयास बहुत ही प्रशंसनीय है। https://t.co/2CFClo3ERZ
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023