जम्मू कश्मीरमध्ये भारतीय रेल्वेकडून उभारल्या जात असलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब पुलावरील कमानीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकोद्गार काढले आहेत.
“आपल्या देशबांधवांची सक्षमता आणि विश्वास यांनी जगाला उदाहरण घालून दिले आहे”, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “या बांधकामातील यशस्वीतेचे उदाहरण फक्त आधुनिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताच्या भीमपराक्रमाचेच उदाहरण नाही तर “संकल्प से सिद्धि” या नीतीने घडवलेल्या बदलत्या कार्यसंस्कृतीचेही उदाहरण आहे.” असे त्यांनी ट्विटर संदेशात नमूद केले आहे.
देश के जन-जन का सामर्थ्य और विश्वास आज दुनिया के सामने एक मिसाल पेश कर रहा है। यह निर्माण कार्य न केवल अत्याधुनिक इंजीनियरिंग और टेक्नोलॉजी के क्षेत्र में भारत की बढ़ती ताकत को प्रदर्शित करता है, बल्कि संकल्प से सिद्धि की देश की बदली हुई कार्य संस्कृति का भी उदाहरण है। https://t.co/Hup2RByHYM
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2021