उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी आज उत्तर प्रदेशमधील भव्य वस्त्रोद्योग पार्कच्या उद्घाटनाबाबत केलेले ट्विट सामायिक करताना, पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशांमध्ये म्हटले आहे;
“उत्तर प्रदेशमध्ये वस्त्रोद्योगाची समृद्ध परंपरा,मोठी बाजारपेठ आणि ग्राहकवर्ग आहे. हे कष्टकरी विणकर आणि कुशल कामगारांचे माहेरघर आहे.लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कच्या उभारणीचा उत्तर प्रदेशला खूप फायदा होईल.”
“उत्तर प्रदेशातील माझ्या सर्व बंधू-भगिनींसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.लखनौ आणि हरदोई येथे पीएम मित्र पार्कचे लोकार्पण होत आहे.या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”
“1000 पेक्षा अधिक एकरांवर व्याप्त हे पीएम मित्र पार्क स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करणार आहे.देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रालाही यामुळे नवे बळ मिळणार आहे.”
Uttar Pradesh has rich tradition of textiles, a big market and consumer base. It is home to hardworking weavers and a skilled workforce. The setting up of the PM Mitra Mega Textiles Park across Lucknow and Hardoi districts will greatly benefit UP. #PragatiKaPmMitra https://t.co/su1OlbHlQe
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2023
उत्तर प्रदेश के मेरे सभी भाइयों और बहनों के लिए आज एक बहुत अहम दिन है। लखनऊ और हरदोई में PM MITRA पार्क का शुभारंभ होने जा रहा है। इस अवसर पर आप सभी को मेरी बहुत-बहुत शुभकामनाएं। #PragatiKaPmMitra https://t.co/su1OlbHlQe
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2023