पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना दिल्याने भारतीय प्रतिभेवरील आपला विश्वासही दिसून येतो असे ते म्हणाले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे ट्विट पंतप्रधानांनी सामायिक केले. यामधे संरक्षण मंत्र्यांनी 70,500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना आणि आर्थिक वर्ष 23 मध्ये 2.71 लाख कोटी रुपयांहून अधिक सरकारी खरेदीला मंजुरी दिली आहे. यात 99 टक्के पुरवठा भारतीय उद्योगांकडून केला जाणार आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला चालना देणे हे भारतीय प्रतिभेवरील आपल्या दृढ विश्वासाचे निदर्शक आहे."
A boost to self-reliance in defence, also reaffirming our faith in Indian talent. https://t.co/igjPfcjk3P
— Narendra Modi (@narendramodi) March 17, 2023