पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये वैद्यकीय शिक्षणातल्या नवीन युगाची प्रशंसा केली आहे. वीस जिल्हा शासकीय रुग्णालयात 265 डीएनबी पदव्युत्तर वैद्यकीय जागांना परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं पंतप्रधानांनी स्वागत केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये युवाशक्तीचं सबलीकरण करण्याच्या तसेच वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने केलेला हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय यांचं ट्विट सामायिक करत पंतप्रधान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘जम्मू काश्मीर मधल्या युवाशक्तीचं सबलीकरण करण्यात तसच वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा वृद्धींगत करण्याच्या उद्देशान केलेला हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे !’
This is an important effort aimed at empowering the youth and furthering medical infrastructure in Jammu and Kashmir! https://t.co/kPJY1PgAh4
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2022