‘कन्या शिक्षण प्रवेश उत्सव अभियान’ “जास्तीतजास्त मुलींना शिक्षणाचा आनंद मिळवून देणारा एक अनुकरणीय प्रयत्न” असल्याचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक तरुणीला शिक्षण आणि कौशल्य मिळवता यावे यासाठी ही मोहीम आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.
“जास्तीतजास्त मुलींना शिक्षणाचा आनंद मिळावा यासाठीचा हा एक अनुकरणीय प्रयत्न! एक राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करूया".
An exemplary effort which will ensure more girls get the joys of education!
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2022
Let us all, as a nation, come together and make this movement a success. https://t.co/Z6VLdF4vLg