दैनंदिन प्रवासी संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचल्याबद्दलच नव्हे, तर कोविड 19 पूर्व काळापासून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे कौतुक केले आहे. आर्थिक प्रगती आणि जीवनमान सुलभ होण्यासाठी महत्वाचे असलेले संपूर्ण भारतातील दळणवळण अधिक सुधारण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे असे मोदी म्हणाले.
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ट्विटचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले;
"उत्तम निदर्शक. संपूर्ण भारतातील दळणवळण सुधारण्यावर आमचे लक्ष आहे. हे सुलभ जीवन आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे."
Great sign. Our focus is to further improve connectivity across India, which is important for ‘Ease of Living’ and economic progress. https://t.co/HiNEn0ozXq
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2022