वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, ही एक मोठी कर सुधारणा आहे, ज्यामुळे ‘व्यवसाय सुलभता' वाढली आणि ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना पूर्णत्वाला नेली.
माय जीओव्ही इंडियाच्या ( MyGovIndia) ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"आपण जीएसटीची 5 वर्षे साजरी करत आहोत, ही एक प्रमुख कर सुधारणा आहे ज्यामुळे 'व्यवसाय सुलभता' वाढली आणि 'एक देश , एक कर' ही संकल्पना पूर्णत्वाला नेली."
We mark #5YearsofGST, a major tax reform that furthered ‘Ease of Doing Business’ and fulfilled the vision of ‘One Nation, One Tax.’ https://t.co/fL3kJbz4ty
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2022